सावकारी पाशातून प्राथमिक शिक्षकांची मुक्तता व्हावी या हेतूने २१ आक्टोबर १९२४ रोजी "आपली करा आपणच सोडवणूक" या तत्वाने कै. कृ. भा. बाबर यांचे पुढाकाराने व १४ प्रवर्तकांसह मसूर ता. कराड येथे "सातारा जिल्हा लोकल बोर्ड प्राथमिक शिक्षक सोसा. लि., " या नावाने संस्थेची स्थापना केली यावेळी तीन मुख्य उद्देश ठरविणेत आले.
यानंतर दि. १७ एप्रिल १९४८ रोजी संस्थेची विभागणी उत्तर व दक्षिण सातारा होवून जिल्ह्यातील कराड व पाटण तालुके वगळून २ तालुक्यांसाठी "सातारा जिल्हा लोकल बोर्ड उत्तरभाग प्राथमिक शिक्षकांची सह. बँक लि., सातारा" या नावाने कामकाजास सुरुवात झाली. पुढे काळाचे ओघात नवनवीन बदल होत गेले व दि. १७-१०-८१ रोजी "प्राथमिक शिक्षक सहकारी बैंक लि., सातारा" असे सुटसुटीत व नवे नाव बँकेने धारण केले. सध्या संपूर्ण सातारा जिल्हा कार्यक्षेत्र करणेत बँक यशस्वी झाली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये बँकेच्या १३ शाखा व हेड ऑफिस असे कार्यक्षेत्र आहे.
Leave A Message